महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे.
मुख्य पृष्ठ संपर्क
पाठ्यपुस्तक मंडळ
स्थापना :
  • पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीसाठी राज्य सरकारांनी व्यावसायिक तत्त्वावर चालणारी स्वायत्त संस्था स्थापन करावी अशी कोठारी आयोगाची १९६४ ची शिफारस.
  • त्यानुसार २७ जानेवारी १९६७ रोजी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापन.
व्यवस्थापन :
  • राज्यांचे शालेय शिक्षणमंत्री मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष , राज्यमंत्री पदसिद्ध उपाध्यक्ष.
  • शिक्षण संचालक , समकक्ष अधिकारी मंडळाचे संचालक.
  • मंडळाच्या व्यवस्थापनाचे नियामक मंडळाला उच्चाधिकार.
  • नियामक मडंळास सहाय्यासाठी विद्या परिषद, अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक संशोधन सल्लागार परिषद, वित्त समिती व कार्यकारी समिती कार्यरत.
उद्दिष्टे :
  • शालेय शिक्षणाच्या अभिवृद्धीसाठी साहाय्य व उत्तेजन.
  • शालेय पाठ्यपुस्तके, शिक्षकांकरिता हस्तपुस्तिका, मार्गदर्शिका, विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय पुस्तिका,पूरक शैक्षणिक साहित्याची निर्मिती.
  • पाठ्यपुस्तके, शैक्षणिक साहित्याची छपाई, प्रकाशन, साठा, वितरण व विक्रीची व्यवस्था.
स्वरूप :
  • मंडळाची नोंदणी ‘संस्था नोंदणी अधिनियम १८६०’ व ‘पब्लिक ट्रस्ट अॅक्ट १९५०’ अंतर्गत.
  • पाठ्यपुस्तक निर्मितीचा एकाधिकार असलेली स्वतंत्र व स्वायत्त यंत्रणा असे मंडळाचे स्वरूप.
प्रशासकीय रचना :
  • पुणे येथे मंडळाचे मुख्य कार्यालय, मुंबई येथे नियंत्रक कार्यालय.
  • पाठ्यपुस्तकांच्या वितरणासाठी गोरेगांव (मुंबई), पनवेल, पुणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, लातूर व अमरावती येथे प्रमुख विभागीय भांडारे.
  • दैनंदिन कामकाजासाठी मंडळाचे विद्या, निर्मिती, वित्त, प्रशासन, वितरण, स्थावर, विधी व माहिती, अंतर्गत लेखापरीक्षण, संशोधन, संगणक, ग्रंथालय, किशोर असे बारा विभाग कार्यरत.
कार्यकक्षा :
  • महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाशी संलग्न असलेल्या प्राथमिक ते उच्चमाध्यमिक शाळांतील पहिली ते बारावी या इयत्तांची सर्व पाठ्यपुस्तके.
  • इयत्ता पहिली ते बारावी च्या विद्यार्थ्यांसाठी पूरक शैक्षणिक साहित्याची निर्मिती करणे.