बालभारती ग्रंथालय एक संदर्भ ग्रंथालय असून अंदाजे ११००० स्के.फूट क्षेत्रफळ जागेमध्ये विस्तारलेले अतिशय समृद्ध,सुसज्ज व संगणकीकृत ग्रंथालय आहे.
या ग्रंथालयाचा उपयोग पाठ्यपुस्तक निर्मितीसाठी संबधित विषय समित्यांना व लेखकांना होतो.
या ग्रंथालयात इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, सिंधी, उर्दू, तेलूगू, या भाषेतील पुस्तकांचा मोठा संग्रह असून फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, संस्कृत, पाली, अर्धमागधी इत्यादी भाषेतील पुस्तकेही पाठ्यपुस्तकांसाठी म्हणून ग्रंथालयात संग्रहीत करण्यात आलेली आहेत.
या ग्रंथालयात ज्ञानकोश,विश्वकोश, शब्दकोश, नकाशे, रिस्टिकटेड/अनरिस्टिकटेड मॅप्स, रिलिफ मॅप्स, सीडी व ऑडियो कॅसेट, पाठ्यपुस्तके,ललित साहित्य,शासकीय प्रकाशने इत्यादी विविध प्रकारचे साहित्य संपदा असून जवळ जवळ १ लाख ५५ हजार ( १.५५ लक्ष) ग्रंथ संग्रह आहे.
या ग्रंथालयात सन १८३७ सालापासूनची दुर्मिळ पाठ्यपुस्तके संग्रहीत असून त्या सर्व पुस्तकांचे डिजिटायझेशन करण्यात आलेले आहे.
मंडळाच्या जुन्या मालेतील पाठ्यपुस्तकांची डिजिटायझेशन प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. आतापर्यंत २ लाख ५० हजार पृष्ठाचे डिजिटायझेशनचे काम पूर्ण झालेले आहे. लवकरच यातील मंडळाच्या जुन्या मालेतील पाठ्यपुस्तके मंडळाच्या वेबसाईटवर सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याची योजना आहे.आत्तापर्यंत जवळ जवळ २१८८ पाठ्यपुस्तके/पुस्तकांचे डिजिटायझेशन करण्यात आलेले आहे.
ग्रंथालयात मध्यप्रदेश, बिहार, गुजरात, कर्नाटक, पंजाब, मणिपूर इत्यादी अनेक राज्यांची पाठ्यपुस्तके संग्रहित आहेत.तसेच CBSC, GCSC, ICSC व IB बोर्डाची पाठ्यपुस्तके संग्रहित आहेत.तसेच जपान, फ्रांस, चीन, कोरिया इत्यादी देशांची पाठ्यपुस्तके संग्रहित आहेत.
ग्रंथालयात २२ परदेशी नियतकालिके/जर्नल्स आणि ११४ विविध भाषेतील नियतकालिकांची वर्गणी भरून सदस्यता घेतलेली असून १० नियतकालिके भेटप्रत म्हणून येतात. मंडळाच्या स्थापनेपासून वर्गणीद्वारे येणाऱ्या नियतकालिकांचे/जर्नल्सचे जवळ जवळ ५५०० बांधीव खंड संग्रहित आहेत.
दरवर्षी ग्रंथालयामध्ये ३ ते ४ हजार पुस्तके खरेदी व देणगीद्वारे येत असतात.
ग्रंथालयातील पाठ्यपुस्तके समिती सदस्यांसाठी ग्रंथालयाद्वारे विविध मोफत ई-बुक्स, ई-जर्नल्सचे ऑनलाईन डेटाबेस उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
बाहेरील संशोधक ,विद्यार्थी व अभ्यासक यांनाही या ग्रंथालयाची ग्रंथालयीन सेवा मर्यादित स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येत असते.